Who is Nadir Shah Afshar |The history of नादिर शाह |
मराठयांच्या इतिहासाला कलाटणी देणारा अहमदशाहा अब्दाली याला घडवण्यात नादिर शहाचा मोठा हात आढळुन येतो. ज्याच्या सैन्यात एक सैनिक म्हणुन अहमदशहा अब्दाली राहिला आणि त्याच राज्याचा राजा झााला. नंतर पुढे चालुन तो भारताच्या इतिहासात अमर झााला.
![]() |
Nadir shah afshar : Bio |
नादिर शाहाचा जन्म खारासान म्हणजेच उत्तर पुर्वी इरानच्या अफशार कजलबस मधल्या एका साधारण परिवारात झााला. त्याचे वडिल हे शेतकरी होते. नादिर लहान असतानाच त्याच्या वडिलांचा मृत्यु झााला. त्याच्या आईला देखील गुलाम बनवल गेल पण नादिर पळुन जाण्यात यशस्वी झाला. नंतर तो अफशार कबिल्यात शामिल झाला आणि काही दिवसातच तो त्या कबिल्याचा प्रमुख नेमला गेला. नादिर हा धिप्पाड शरिराचा तरुण होता. आपल्या शत्रूसाठी तो निर्दयी होता. पण साथिदारासाठी तो उदार मनाचा होता. नादिरचा आवाजही गम्भीर होता आणि त्याच्या सफलतेमाग हेदेखील एक कारण मानल जात. त्या वेळी फारसच्या गादिवर साफवियांच राज्य होत आणि नादिर हा सेनानायक होता. एकिकडुन उस्मानी सामाज्य तर दुसरिकडुन अफगानियांच्या विद्रोहाने साफवियांच्या नाकात दम आणला होता. इकडून रुस साम्राज्यदेखील डोळे लावुनच बसलेल होत. त्या वेळेसच्या साफवियांच्या राजा शाह सुल्तान हुसैन याचा मुलगा तहमास्य याला नादिरन साथ दिली आणि खोरासानची राजधानी मशहद मधुन अफगानियांना पळवून लावल.
Also see :- ' भवानी ' तलवार आणि ' ३२ मन सोन्याचं सिंहासन '
नादिरच्या या कामावर तहमास्य खुश झाला आणि त्याने नादिरला कुली तहमास्य (तहमास्य चा सेवक) अशी पदवी दिली. पण नादिर यावरच खुश होणारा सेनानायक नव्हता. नादिरने यानंतर हेरातच्या अफगान्यांना पराभुत केल.
सोबतच राजधानी इस्फहाजवर कब्जा केलेल्या अफगान्यांवर त्याने 1729 मध्ये आक्रमण केल. यावेळेस एक युनानी व्यापारी बेसाईल वतात्जेस याने नादिरला सैन्य अभ्यास करताना पाहिले याचे वर्णन करताना तो म्हणतो कि -
"अभ्यास क्षेतात घुसल्यानंतर नादिर आपल्या सेनानायकांच अभिवादन करण्यासाठी डोक झुकवतो, तो आपला घोडा थांबवत असे आणि थोडा वेळ शांत राहुन सेनेच निरीक्षण करत असे. नादिर अभ्यास सुरु होण्याची अनुमती दयायचा आणि नंतरच अभ्यास चालु होत असे. चक्र, व्युह, रचना आणि घोडेस्वारी इत्यादी.
![]() |
Nadir shaha : Empire |
नादिर स्वत: तिन तास घोडयावर बसुन अभ्यास करत असे. इस. 1729 संपेपर्यंत नादिरने तिन वेळेस अफगान्यांना हरवल होत आणि 'इस्फहान' (शहराचे नाव) वापस आपल्या कब्जेत घेतल होत. यानंतर नादिरने आपले सैन्य वाढवण्यास सुरुवात केली, यासाठी त्याने तहमास्य याची मदत घेतली आणि पश्चीम दिशेला असणाऱ्या उस्मानियांना पळवून लावले. साम्राज्यविस्ताराचा नशा नादिरवर चढला होता. आणि यानंतरच त्याने पुर्व दिशेला कुच करण्यास सुरुवात केली. पुर्वेकडे जाताना त्याने पहिल्यांदा हेरातवर आपला कब्जा केला.
नादिरची सफलता पाहुन तहमास्य खुश झाला नाही, त्याला तक्तापलट होण्याची भिती वाटु लागली. त्याने आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा उस्मानियांसोबत युद्ध सुरु केल, परंतु तहमास्यला या युध्दात पराभवाला सामोरे जाव लागल, आणि नादिरने जिंकलेले काही किल्लेसुद्धा त्याला गमवावे लागले. नादिर जेव्हा हेरात जिंकुन परत आपल्या राज्यात आला तेव्हा हे सार पाहुन तो निराश झाला आणि नादिरच्या एका इशाऱ्यावरुन तहमास्यचा मुलगा अब्बास याला गादिवर बसवल गेल.
Nadir shah attacks on Delhi | नादिर शाह यांच्याकडून दिल्लीवर आक्रमण |
राज्यभिषेकाच्या वेळी नादिरने घोषणा केली कि तो कन्दहर दिल्ली आणि बुखारा सोबतच इस्ताबुल वर सुद्धा आक्रमण करेल आणि तिथेदेखील आपली सत्ता कायम करेल. परंतु त्या वेळेस नादिरच्या या गोष्टीकडे कोणीही लक्ष दिले नाही. पश्चीमी दिशेला साम्राज्य वाढवल्यानंतर नादिर पुर्वेकडे आगेकुच करु लागला. त्याने कन्दहरवर विजय प्राप्त केला. "मुघलांनी अफगााणी भगोडयांना शरण दिलेली आहे", असे म्हणुन त्याने मुघलांवर आक्रमण करायला सुरुवात केली. काबुलवर कब्जा केल्यानंतर त्याने दिल्लीवर सुद्धा आक्रमण केल. करनाल या ठिकाणी मुघल राजा 'मोहम्मद शाहा' आणि नादिर याच्यात युद्ध झाल. पण कमि सैन्य असतानादेखील नादिर बारुदी अस्त्राच्या जोरावर जिंकला गेला. यानंतर 1739 मध्ये दिल्ली पोहचल्यानंतर त्याने एका दिवसात जवळजवळ 20 ते 22 हजार सैनिकांची हत्या केली आणि अमाप खजीना लुटला, ज्याच्यात 'कोहिनुर' चा देखील समावेश आढळून येतो.
Deaths Of Nadir Shah Afshar | नादिर चा शेवट |
आपल्या जिवनाच्या शेवटपर्यंत नादिर हा जुलमी आणि अत्याचारी शासक बनलेला होता. पैशाच्या अभावामुळे तो आपल्या जवळच्या नातेवाइकाकडे पैशाची मागणी करु लागला. नादिरच्या शेवटी तो आजाराने ग्रस्त होता. शेवटी 19 जुन 1747 मध्ये त्याच्या जवळच्या अंगरक्षकांनीच त्याची क्रूरपणे हत्या केली. नादिरचा शेवट झाल्यानंतर त्याचा मुलगा 'अली कुली' याने स्वतःला राजा घोषीत केले आणि स्वतःच नाव बदलुन 'आदिल खान' असं ठेवलं.
नादिरच्या मुत्युनंतर त्याच साम्राज्य जास्त दिवस टिकु शकल नाही. नादिरला युरोपात एका विजेत्याच्या रुपात प्रसिद्धी मिळाली खरी पण जिवनाच्या शेवटी-शेवटी त्याने केलेल्या कृत्यामुळे तो एक क्रूर व अत्याचारी शासक बनला.
1739 मध्ये नादिरने भारतावर केलेल्या आक्रमणामुळे इंग्रजांना मुघलांची कमजोरी कळाली आणि त्यांना मुघलांवर जिंकण्याचा मार्गही कळाला . असंदेखील म्हंटल जातं कि जर नादिर भारतावर आक्रमण करत नव्हता तर इंग्रज भारतात येउच शकले नसते आणि आज भारताचा इतिहास आपल्यासमोर काही वेगळाच असला असता.
टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा