' भवानी ' तलवार आणि ' ३२ मन सोन्याचं सिंहासन '

 प्रतीपचंद्र लेखेव वर्दीश्वविष्णू वंदिता ||
 शाहसूनो शिवश्येषा मुद्रा भद्राय राजते ||

प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाने प्रतिदिन वृद्धिंगत होणारी संपूर्ण जगाला वंदनीय असणारी शाहपुत्रा शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे, असा या राजमुद्रेचा अर्थ.
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलं तरी आंगावर शहारे येतात आणि आंगात सळसळत रक्त वाहत, छत्रपतींचे नाव जरी घेतलं तर संपूर्ण मराठ्यांचा सुवर्ण इतिहास आपल्या समोर जिवंतपणे उभा राहतो.

शिवाजी महाराजांनी त्यांच्या संपुर्ण जिवनात जवळजवळ २४० किल्ले आणि कितीतरी युद्ध जिंकली.
मुघल, आदिलशहा, कुतुबशहा, ब्रिटिश डच, पोर्तुगिज आणि कितीतरी माराठ्यासोबत सुध्दा त्यांनी युद्ध लढले, परंतु एक किल्ला ज्याचं नाव पुरंदर, तो जिंकताना छत्रपतींना जवळजवळ २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले. परंतु नंतर त्यांनी त्यांच्या भवानी तलवारीच्या जोरावर ते सर्व किल्ले सुध्दा जिंकले.

Bhawani talwar, chatrapati shivaji
Chatrapati 'Shivaji Maharaj'

छत्रपतींच्या तीन तलवारी होत्या. भवानी, तुळजा, आणि जगदंबा. तुळजा तलवार ही त्यांना त्यांच्या वडिलानी (शाहू महारजांनी) भेट दिलेली होती.
भवानी तलवारीचा इतिहास हा वेगवेगळया प्रकारे सांगितला जातो. शिवभारत या काव्यात असं म्हटलं आहे की ही तलवार साक्षात भवानी मातेने दिलेली आहे. पण ही फक्त एक अफवाच म्हणता येईल. भवानी तलवारीचा एक असा देखील गैरसमज आहे की ही तलवार आज देखील इंग्लंडच्या संग्रहालयात ठेवलेली आहे, परंतु ती तलवार मुळात भवानी तलवार नाहीच.

तारीख होती ७ मार्च १६५९, त्या वेळी छत्रपती अंबाजी सिपहासालार यांच्यासोबत कोकणच्या दौऱ्यावर होते. तेथे असताना त्यांनी एका स्पेनी जहाजावर आक्रमण केलं आणि सेनापती डियोंग फर्नांडिस याच्याकडून एक तलवार लुटली. या घटनेनंतर १६ मार्च महाशिवरात्रीला अंबजीचा मुलगा कृष्णाजी याने छत्रपतींना ही तलवार भेट दिली. छत्रपतींना ही तलवार खुपचं आवडली आणि त्यांनी तलवारीला भवानी अस नाव दिलं. तलवारीची धार आणि हलकं वजन या गोष्टी राजांना खुपचं आवडल्या, म्हणून त्यांनी कृष्णाजी यांना ३०० सोन्याची शिक्के भेट म्हणून दिले, ज्याची आजची किंमत ७ करोड २० लाख अशी होते.

छत्रपती भवानी तलवारीचा बनावतीमुळे खुपचं प्रभावित झाले. त्यांना वाटलं की अशी तलवार आपल्या प्रत्येक सैनिकाकडे असायल हवी, आणि म्हणूनच राजेंनी स्पेनच्या एका राजाला अशा तलवारी बनवण्याच टेंडर दिलं. स्पेन मधल्या Medrid येथील टोलेडो नावाच्या गावात आजदेखील अशा तलवारी बनवल्या जातात. स्पेनच्या राजा शिवाजी महाराजांवर खुश झाला आणि त्याने त्यांना एक रत्नजडित तलवार भेट दिली ज्याला जगदंबा अस नाव देण्यात आलं आणि हीच तलवार आज देखील इंग्लंडच्या मुजियम मध्ये ठेवलेली आहे. परणू तुळजा आणि भवानी या दोन तलवारी कुठं आहेत, हे कोणालाही माहीत नाही.

आसदेखील म्हटलं जातं की छत्रपतींची भवानी तलवार ही ६६ किलो वजनाची होती, परंतु ही फक्त एक आफवाच म्हणता येईल. कारण राजाचं वजनाचं ७२ किलो होत, आणि युध्दात ६६ किलो वजनाची तलवार उचलणं आणि युध्दात त्याचा वापर करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे.
३ एप्रिल १६८०, छपत्रपतींच्या मृत्यू नंतर मराठ्यांचा सरदार म्हणून संभाजी राजांना राजा घोषित केलं. आणि त्यांच्या राज्याभिषेकानंतर १६८९ हे वर्ष मराठ्यांच्या इतिहासात सर्वात काळ वर्ष ठरलं.

संभाजी महाराजांचा मेहुणा गणोजी शिर्के याने मुकर्रबखान याच्यासोबत मिळून संभाजी राजांवर हल्ला केला, आणि त्यांना कैद केली. कैदेत असताना औरंगजेबाने त्यांचे हालहाल केले, आणि शेवटी ३ एप्रिल १६८९ ला संभाजी महाराज यांचा मृत्यू झाला. संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांची सत्ता संपुष्टात येऊ लागली, आणि याची जाणीव होताच राणी येसूबाई ( संभाजी महाराजांच्या पत्नी ) यांनी संभाजी महाराजांच्या भावास ( राजाराम महाराज ) मराठ्यांचा राजा बनवण्याचा निर्णय घेतला. औरंगजेब शिवाजी महाराजांच्या संपूर्ण वंशाचाच नाश करण्यासाठी राजाराम महाराजांच्या मागे लागला. मोघलांपासून वाचण्यासाठी राजाराम महाराज जिंजीला निघाले असताना त्यांना देखिल कैद झाली, आणि या घटनेनंतर मराठ्यांना मोठा धक्का बसला.

महाराणी येसूबाई यांनी राजाराम महाराज यांना सोडण्यासाठी औरंगजेबाच्या काही अटी मान्य केल्या, आणि रायगड ज्याच्यावर ३२ मन सोन्याचं (१२८० किलो ) सिहासन सुध्दा होतं, तो रायगड मुघलांना देण्याचा निर्णय घेतला. यानंतर औरंगझेबाच्या सेनापती जुल्फिकार खान याने रायगडावरील सिंहासनाचा नाश केला, आणि ते सिंहासन वितळवून टाकले असा दावा केला जातो. परंतु इतिहासात या घटनेचा दावा कुठंही आढळत नाही, त्यामुळे औरंगजेबाच्या कब्जेनंतर त्या सिंहसनाचे नेमके काय झाले याचा इतिहास आजपर्यंत कोणालाही माहीत नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जरी मराठेशाहीला गळती लागली असली, तरी पुढे चालून औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठ्यांची सत्ता उदयास आली.

टिप्पणी पोस्ट करा